कुटुंबाच्या आहाराचा समतोल आपण कसा राखू शकतो.

How to Balance Family Diet : सध्या घरातील प्रत्येक घडामोडीत स्त्री आणि पुरुषाचा समान वाटा असतो. पण भारतात अजून तरी ८०% कुटुंबात स्वयंपाकाची धुरा स्त्रीकडेच असते. कुटुंबाच्या आहाराचा समतोल राखणे हे त्या कुटुंबातील स्त्रीची जबाबदारी असते. कुटुंबातल्या प्रत्येकाच्या दैनंदिन आहारात प्रथिने, स्निग्ध पदार्थ, कर्बोदके यांचा समावेश राखणे गरजेचे असते.

How to balance family diet

आजकाल प्रत्येक स्त्री नोकरी, जोडधंदा, घरगुती व्यवसाय ह्यात अग्रेसर असते. साहजिकच वेळ कमी. मग काय मुलांना डबा करताना झटपट काय देता येईल या कडे स्रियांचा कल जास्त असतो. उदा. “सँडविच” ब्रेडचे दोन पीस त्यावर सॉस, बटर, चीज, मेयोनीज थापले कि झाला डबा तयार.

आधीच्या काळात स्त्रिया लवकर उठून किंवा वेळ काढून डब्यात वेगवेगळे पौष्टीक पदार्थ बनवायचे जसे कि, चपाती मेथीची भाजी (त्यात शेंगदाणा कूट, तांदळाची कणी, डाळ हे पदार्थ घालून भाजी करायचे). त्यामुळे मुलांना चौकस आहार आणि वेगवेगळे जीवनसत्वे मिळायचे किंवा गूळपोळी, शेंगदाणा पोळी थालीपीठ असे पदार्थ असायचे पण आजकाल माता धावपळीच्या जगात पोळीला जॅम, चॉकलेट स्प्रेड, मेयोनीज असे पदार्थ थापून पाच मिनिटात डबा तयार करतात. आणि मुले पण हे चटपटीत पदार्थ आवडीने खातात. याचा परिणाम मुलांना समतोल आहार न मिळाल्यामुळे पुढे कुपोषित होतात. (अति किंवा कमी पोषण) प्रौढ व्यक्तीसाठी आहाराचा समतोल राखण सोपं असत. परंतु मुलांसाठी थोडे कष्ट घ्यावे लागतात. मुलांच्या वाढीच्या काळात योग्य आहारात आईचा किंवा स्त्रीचे खूप मोठे योगदान असते. उदा. वाढत्या वयात मुलांना प्रथिनांची, कॅल्शियमची गरज असते, मग कोणते पदार्थ निवडावे कोणते टाळावे हे स्त्रीला माहित असणे गरजेचे आहे. प्रत्येक स्त्रीला आपल्या मुलांची, कुटुंबाची आहारतज्ज्ञ (How to Balance Family Diet) होणे गरजेचे आहे. त्यांना थोडा वेळ देऊन त्यांचं आहाराबद्दल जनरल कौन्सलिंग केले पाहिजे. काय वाईट काय चांगलं कशासाठी चांगलं हे पटवून द्यायला हवं.

नोकरदार महिलांसाठी शरिरास पोषक आहाराचे महत्व

आजकाल स्त्रियांना खूप स्वातंत्र आहे; मुभा आहे. किटी पार्टी, मैत्रिणी बरोबर ट्रिप यासाठी वेळ असतो पण मुलांना वेगवेगळ्या प्रकारचे लाडू, चिक्की, खिरी बनवायला वेळ नसतो. आपण हे विसरारतो कि आपल्या आई आजीने काय खायला दिले होते, ज्यामुळे आता आपण तंदरुस्त आहोत. पण आपल्या मुलांच्या भविष्यतील आरोग्य काय ? मुले रडायला लागली कि आपण चॉकलेट पिझा, बर्गर यांचा मारा करतो किंवा जेवण बनवायचा कंटाळा आला, वेळ नसला तर स्वीगी झोमॅटो आहेतच. पण यासारख्या जंकफूड मुळेआपल्या बरोबरच मुलांचे शरीर मजबूत न होता ते कमकुवत होत जाते. स्नायू कमकुवत होतात. कर्बोदके मेद अति प्रमाणात सेवन केल्यामुळे वजन वाढते. कुटुंबातील लोकांना योग्य आहार देण्यात त्या कुटुंबाती स्त्रीचा मोठा वाटा असतो. जर स्त्रिया अन्ना बद्दल जागरूक असतील तर संपूर्ण कुटुंब अन्नाबद्दल जागरूक होईल. जर स्त्रीच कंटाळा करायला लागली किंवा तिलाच बाहेरील पदार्थ खाण्याची सवय असली तर मुले काय शिकणार. आपण स्वतःकडून, इतरांकडून, मुलांकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा ठेवून असतो, पण हि कामगिरी करायला किंवा अभ्यासात, खेळात प्राविण्य मिळवायला यासाठी लागणाऱ्या योग्य पोषणाकडे आपण लक्षा देतो का ? ते आपण पुरवतो का? आजच्या मुलांच्या घरातल्या प्रत्येकाच्या आवडी निवडी लक्षात घेता हे साहजिकच एक आवाहन आहे. परंतु प्रत्येक समस्येला उत्तर हे असतेच, तसेच आपल्या घरातील जेवणामध्ये हवे तसे बदल करू शकतो. उदा. मुले जर पोळीभाजी खात नसतील तर रोल पराठा यासारखे पदार्थ करून देऊ शकता पण त्याऐवजी फ्रँकी, मैग्गी, पास्ता या सारखे पदार्थ टाळावे. स्त्रिया आणि कौटुंबिक आरोग्य हे अतिशय चांगल्या प्रकारे जोडलेले आहेत. जर स्त्रिया थोड्या सतर्क झाल्या तर संपूर्ण कुटुंबाची चांगली खाण्याची  सवय आमलात आणू शकतो.

NUTRITION MANAGEMENT IN REFEEDING SYNDROME

स्त्रियांनी खरेदी करताना सतर्कतेने खरेदी करावे. पदार्थ वरील लेबल वाचून निवडावा. जसे कि कोलेस्ट्रॉल, फॅट, शुगर चे लेबल आवर्जून वाचावे. त्यातील आरोग्यदायी पर्याय निवडावे. जसे कि मुलांना चिप्स देताना तळलेले न देता भाजलेले द्यावे. जर घरी कोणाला कोलेस्ट्रॉल, उच्च रक्तदाब, मधुमेह असेल तर खरेदीच्यावेळी तुमच्या लक्षात असले पाहिजे कि मधुमेह मध्ये सामान्यतः काय खाऊ शकतात किंवा काय खाऊ शकत नाहीत आणि त्यासाठी काही आरोग्यदायी पर्याय उपलब्ध आहेत.

आजकाल सगळ्या सुपर मार्केट मध्ये किंवा मॉल मध्ये आरोग्यदायी पर्याय उपलब्ध असतात. उदा. शुगर फ्री आईस्क्रीम, साखरेऐवजी गूळ घालून केलेले पदार्थ, मैदयाऐवजी मल्टिग्रेन आटा वापरून केलेले पदार्थ इ. जर आपणच आहाराकडे दुर्लक्ष केले आणि कुटुंबातल्या एखाद्याला पोषण संबंधी काही आजार झाला तर आपल्या अडचणी अजूनच वाढतात.

आजकाल वेळे अभावी स्वयंपाक घरामधील स्वच्छतेमध्ये हलगर्जी केली जाते. आपण जर चांगले जेवण बनविले ते पण अस्वच्छ परिस्थिती मध्ये तर त्या जेवणाचा काहीही उपयोग नाही. ५०% मुलांचे आजार हे अन्नजन्य आजार असतात. बैक्टेरिया, विषाणू, बुरशी यामुळे होणारे आजार वारंवार उद्भवतात. जेवण करतेवेळी योग्य स्वच्छता बाळगल्यास आपण अनेक आजार टाळू शकतो.

तर स्त्रियांनो सतर्क व्हा, जागरूक आणि सक्रिय राहा, पैशाप्रमाणेच आपले व आपल्या कुटुंबाचे आरोग्य कमवा.